शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विवेकानंद जयंती निमित्ताने व्याख्यान

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 18/01/2025 5:11 PM

श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विवेकानंद जयंती निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित प्राध्यापक. संजयजी साळवे डॉक्टर मुंजे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट भोसला मिलिटरी कॉलेज नासिक. यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी विवेकानंदाबद्दल सांगितले की स्वामी विवेकानंद खरच युवकांसाठी खूप चांगले प्रेरणास्थान आहेत त्यामुळे सर्वांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागले पाहिजे तेव्हा खरा अर्थाने विद्यार्थ्यांचं जीवन यशस्वी होईल. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न देखील विचारले विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय कापसे यांनी देखील विद्यार्थ्यांना विवेकानंद आणि आजचा युवा याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी ठाकरे यांनी केले मान्यवरांचा परिचय तसेच स्वागत सत्कार प्राध्यापिका. प्राजक्ता जोशी यांनी केला तसेच आभार प्राध्यापक.अंकुश कुंदे यांनी केले. अशा पद्धतीने विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम उत्साहाने पार पडला.

Share

Other News

ताज्या बातम्या