आयएमए च्या वतीने १८ व १९ जानेवारी रोजी मेडीको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन;मेडिको लिगल काँफरन्स - डॉक्टरांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी – डॉ. प्रल्हाद कोटकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/01/2025 7:20 PM

नांदेड – येथे येत्या १८ व १९ जानेवारी रोजी आयएमए नांदेड शाखेच्या वतीने एम.जि.एम इंजिनिअरींग कॉलेज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या दोन दिवसीय राज्यस्तरीत मेडीको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे यात देशभरातून कायद्याचे ज्ञान असलेली डॉक्टर मंडळी, तज्ञ वकील , वरीष्ठ पोलिस अधिकारी ,नगर पालिकेचे अधिकारी , निवृत न्यायाधीश याबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित डॉक्टरांना वैद्यकीय सेवे संदर्भातील कायदे व संहीता याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत या परिषेदेचा लाभ हे आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर , वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व सर्व प्रकारची डॉक्टर मंडळी घेऊ शकणार आहेत अशी माहीती आयएमए नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर यांनी दिली आहे

 

याविषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , डॉक्टरांनी प्रॅक्टिस करत असताना नियम व कायदे या बाबींचा प्रभाव जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठीची ही एक विशेष "मेडिकोलीगल काँफरन्स" आयोजित करण्यात येत असून बदलत्या काळानुसार डॉक्टर ला वैद्यकीय ज्ञानसोबत कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. या परिषदेमध्ये  डॉक्टरांच्या कामाशी संबंधित कायदेशीर मुद्दे, त्यांच्या कर्तव्यांची अटी आणि कायद्याच्या अंतर्गत त्यांची जबाबदारी या विषयी अवगत करण्यात येईल.या मुळे डॉक्टर  निर्भीडपणे आणी कायद्यानुरूप  रुग्ण सेवा करू शकतील. याचा फायदा जेवढा डॉक्टर ला होईल त्यापेक्षा रूग्णाला होईल असे त्यांनी सांगितले

 

.आयएमए नांदेड तर्फे सर्व डॉक्टरांना या परिषदेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे .ही कॉन्फरन्स हायब्रिड म्हणजे ऑफलाइन आणी ऑनलाइन या दोन्ही स्वरूपाची आहे. या साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे असे आवाहन आयोजक आयएमए चे जिल्हाध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर  ,सचिव डॉ राहुल लव्हेकर , कोषाध्यक्ष  डॉ राजेश तगडपल्ले  सायटिंअिक चेअरमन डॉ सुनील मसारे व ऑरगॅनाईझिंग सेक्रेटरी  डॉ सचिन चांदोलकर यांनी केले आहे

 

 

चौकट

 

डॉक्टरांच्या कार्याबद्दल कायदेशीर दृष्टीकोन, जबाबदारी, आणि प्रॅक्टिस संबंधित कायदा मार्गदर्शन …



मेडीको लिगल कॉन्फरन्स मधून, डॉक्टरांना त्यांच्याशी संबंधित कानूनी कायदे(बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट,फायर अॅक्ट,महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड,गर्भ लिंग निदान कायदा,एम टी पी अॅक्ट,कंजूमर प्रोटेक्षण अॅक्ट इत्यादि), आपल्या कामाबद्दल तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन, तसेच संभाव्य कायदेशीर अडचणींना समजून त्यावर उपाय योजना करण्याचे मार्गदर्शन मिळेल यासह. वैद्यकीय व्यावसायिकांची कायदेशीर जबाबदारी व  पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील कायदेशीर संबंध

तसेच मेडिकल प्रॅक्टिस संदर्भातील कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल त्याबरोबरच वैद्यकीय दावे आणि वाद निवारण आणि डॉक्टरांच्या कामाशी संबंधित गोपनीयता आणि सुरक्षा उपाय आदींसह अनेक बाबींवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे

Share

Other News

ताज्या बातम्या