ऐका हो ऐका..... सांगलीतील समस्यांबाबत कोणी बोलणार आहे की नाही? , लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांचा सवाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/11/2024 11:24 AM

    विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू असून सांगली विधानसभा मतदारसंघातही सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या खैरी  झडल्या जात आहेत. एकमेकांवर तू काय केले आणि मी काय केले यावरच बोलले जात आहे. परंतु सांगली मधील अनेक समस्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही*.
        *गेल्या अनेक वर्षांपासून शेरीनाल्याचा प्रश्न आहे तसाच असून या शेरीनाल्याचेच पाणी समस्त सांगलीकरांना पचवावे लागत आहे. समस्त सांगलीमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे याचा नागरिकांना शोध घ्यावा लागत असताना याबाबत ही कोणीही ब्रश शब्द काढायला तयार नाही. सांगलीत अनेक ठिकाणी नशेखोरांचा उच्छाद माजला असून या विरोधातही कोणीही बोलायला तयार नाही. महानगरपालिकेच्या कृपेने सांगलीतील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा नाहक त्रास सांगलीकरांना सहन करावा लागतोय. मोकाट कुत्र्यांनी अनेक लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांवर हल्ले करून त्यांना जखमी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या असतानाही महानगरपालिका प्रशासन यावर काहीही उपाययोजना करायला तयार नाही. या झोपले झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनास जागे करण्याची कोणत्याही लोकप्रतिनिधीने आज पर्यंतच  तसदी  घेतली नाही. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भर दिवसा खुनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून गेल्या सहा-सात महिन्यात खुणांची मालिकाच घडल्याचे दिसून येत असतानाही कोणाही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत या विरोधात पोलीस प्रशासनाला जाब विचारण्याचे धाडस केलेले नाही*.
          *अगदी कराड पासून ते सांगली पर्यंत अनेक साखर कारखान्याचे तसेच दूध डेअऱ्या आणि विविध प्रकल्पांचे दूषित पाणी कृष्णा नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित करण्याचं पाप जे लोक करतात त्यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला विचारण्याचं धाडसही सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या कोणत्याच नेत्याने केल्याचे दिसत नाही*
      *कोट्यावधी रुपये खर्चून नव्यानेच केलेल्या रस्त्यांना काहीच दिवसात भली मोठी भगदाड पडण्याच्या घटना घडल्या. एका पाठोपाठ एक अनेक भागांमध्ये असे धोकादायक खड्डे पडले अनेक माध्यमांसह  विविध सामाजिक संघटना आणि लोकहित मंचच्या वतीने मी स्वतः आवाज उठवून अशा ठेकेदारांना आणि महानगरपालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली परंतु स्वतःला सांगलीचा नेता समजणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या विरोधात पावले उचलल्याची दिसून येत नाहीत*
       *सांगली शहरासह महापालिका क्षेत्रात सर्रासपणे गांजा आणि नशेच्या गोळ्यांची विक्री होत असून या नशेखोरांकडून बलात्कारांसारखे धक्कादायक प्रकार होताना दिसत आहेत याचाच भाग म्हणजे संजय नगर मध्ये काही दिवसांपूर्वी नसेखोर युवकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना. 
          *या साऱ्या बाबी पाहता मला एवढेच म्हणावेसे वाटते ऐका हो ऐका! सांगलीतील समस्यांबाबत कोणी नेता बोलणार आहे का?*

* *मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली**

Share

Other News

ताज्या बातम्या