चंद्रपुर जिल्हयामध्ये विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने दिनांक १५/१०/२०२४ रोजीपासुन मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचे आदेशाने आदर्श आचारसहिता लागु झालेली असुन आचारसहिते दरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा घालणेकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरीता पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंद्रपुर शहरामध्ये पेट्रोलींग करीत असता गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, कुणाल मनीष कातकर वय ३० वर्ष रा. बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर याचे राहते घरी अवैध्य प्राणघातक दारूगोळा (बुलेट) असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्याने सदर इसमाचे राहते घरी जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे घर झडती दरम्यान दारूगोळा एकुण ०६ जिवंत पितळी धातुची बुलेट (9 MM KF) कि.अं. ६,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री. सुदर्शन मुमक्का सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीमती रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री. सुधाकर यादव सा., मा. पोलीस निरीक्षक, प्रभावती ऐकुरके मॅडम, पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि निलेश वाघमारे, पोउपनि संदीप बच्छिरे, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, संतोष कावळे, शाहाबाज सय्यद, विक्रम मेश्राम, राजेश चिताडे, इम्रान खॉन, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, इरशाद शेख, सतोष राठोड मपोहवा भावना रामटेके यांनी केली आहे.