अमरावती : 1 नोव्हेंबर 2005 नंतर सुरू करण्यात आलेली डीसीपीएस पेन्शन योजना, एनपीएस पेन्शन योजना त्यानंतर यूपीएस पेन्शन योजना अशा वेगवेगळ्या खेळी राजकारणातील लोकांनी कर्मचाऱ्यांसोबत खेळण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील नवे तर पूर्ण भारतातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना याकरिता एकत्रित आली व ती जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी म्हणून वेळोवेळी शासन दरबारी निवेदन देण्यात आली, आंदोलने करण्यात आली, वेगवेगळ्या मार्गाने शासनाला जुन्या पेन्शन योजने करिता उपोषण करण्यात आली, विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला परंतु याचा कोणताही परिणाम राजकीय क्षेत्रातील नेत्यांना झाला नाही. सरते शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून राजकारणात एक वेगळा गट निर्माण केला व त्या गटातील ताकत हे अमरावती पदवीधर मतदारसंघात प्रथमता दिसून आली याचा अर्थ सर्व कर्मचारी एकत्र झाल्यास राजकीय क्षेत्रामध्ये कितीही मोठा पक्ष असेल तरी जुनी पेन्शन योजनेतील लढवय्ये नेते यांचा 'जो पेन्शन की बात करेंगा वही देश पर राज करेगा' हा नारा अतिशय प्रभावशाली ठरला. याला शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्वच कर्मचारी व यांच्यासोबत असणारे सखे संबंध याचा परिणाम राजकीय क्षेत्रामध्ये दिसून आलेला आहे व सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अमरावती जिल्ह्यातील राजकारणात स्पष्टपणे दिसून येईल हे तेवढेच खरे. सरते शेवटी जो पक्ष पेन्शन विषयी पुढाकार घेईल व सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करेल त्यांच्यास वतीने राजकारणात पूर्णतः बदल आपल्याला दिसून येईल.