सांगली दि ११,
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सदर बैठक पार पडली .
यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे म्हणाल्या की , राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज (बाबा) पाटील व मिरज मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारामध्ये सर्व महिला पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला असून प्रभाग निहाय प्रत्येक भागात प्रचार करत आहेत , महाविकास आघाडीच्या सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार आम्ही सर्व महिला पदाधिकारी यांनी केला आहे ,
तसेच काल पक्षातील काही महिला पदाधिकारी यांनी सांगली मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्या चे समजले , हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्ष्याशी याचा काही संबंध नाही , त्यांनी घेतलेल्या सदर भूमिकेबाबत पक्षातील वरिष्ठांना कळवले असून ते लवकरच त्यावर आपला निर्णय कळवतील असे ही त्या म्हणाल्या .
यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे ,सांगली शहराध्यक्षा वैशाली धुमाळ, कुपवाड शहराध्यक्षा प्रियांका विचारे , कार्याध्यक्षा संगिता जाधव ,अनिता पांगम,छाया पांढरे,अश्विनी देशपांडे, पूजा आवळे, फिरोजा जमादार ,उज्वला निकम,परवीन फकीर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या