परतवाडा (जि. अमरावती) : अमरावतीच्या फुले प्रेमी कलाकारांनी इतिहास जागविला,सावित्री शक्तीपीठ प्रस्तुत " जोतिबाची सावली... सावित्री माऊली " फुले दाम्पत्यांच्या जीवनातील संघर्ष. या नाट्य प्रयोगाच्या प्रिमिअर शो २४ ऑगस्ट २0२४ रोजी 'सावित्रीबाई फुले स्मारक ' गंज पेठ, पुणे येथील संत शिरोमणी सावता महाराज समाज भूषण समारंभात पार पडला.तर या नाटकाचा पहिला प्रयोग सत्यशोधक समाजाचा स्थापना दिवशी येत्या २४ सप्टेबर २0२४ रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगरात होत आहे. त्यानंतर सबंध राज्यभरात या नाटकाचे प्रयोग होणार आहे. या नाट्यत पुण्याच्या भूमीवर १५० वर्षापूर्वी घडलेल्या घटनाक्रमाचे प्रेक्षकांना साभिनय दर्शन घडविले. या दोन अंकी नाटकाचे लेखन,दिग्दर्शन ,निर्मिती सावित्रीआईच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री सौ. अपूर्वा अरूण सोनार,राष्ट्रपिता जोतिरावांच्या भूमिकेत - सत्यशोधक लेखक मा . जयकुमार चर्जन,आबांच्या भूमिकेत - श्री. निलेश रसे सर,सगुणाऊच्या भूमिकेत- सौ. शीला चर्जन,बंडू नाना शास्त्री - श्री.मनोज छापानी,दत्ताजी - चि.प्रथमेश धोटे,परांजपे - श्री.दिनकर पवार सर,वाळवेकर-अरुण गणोरकर,फातिमा शेख -अनुराधा भुस्कट,काशीबाई -चित्रा रसे,आजारी मुलाची आई - शारदा गणोरकर व शाळेतील स्त्रिया....वर्षा भुयार ,नीलिमा सोनार ,प्रीती तडस ,अर्चना कावलकर ,विशाखा येवतकर ,माया फुलकरी ,अपर्णा जावरकर आदि वैदर्भीय कलावंतांनी भूमिका साकारल्या. यात परतवाड़ा शहरातील जेष्ठ रंगकर्मी व नाटयलेखक अशोक बोंडे, लोककलावंत व राज्य शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप प्राप्त लोक कलावंत कैलाश पेंढारकरयांचे सहकार्य लाभले. श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात शुभारंभ होणारी ही नाट्य कलाकृतीआपण पहावी असे आवाहन दशरथ कुळधरण संस्थापक अध्यक्ष, सावित्री शक्तीपीठ पुणे यांनी केले.
जय जोती ... जय क्रांती ... जय सत्यशोधक
" जोतिबाची सावली... सावित्री माऊली " फुले दाम्पत्यांच्या जीवनातील संघर्ष.