सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीरदादागाडगीळ यांनी आगामी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊन समस्त सांगलीकरांसह महाराष्ट्राला धक्का दिल्याचे वृत्त समोर येत आहे .परंतु आमदार सुधीर दादा गाडगीळ हे निष्कलंक आणि कोणतेही पक्षीय राजकारण न करता आपले काम तितक्याच तत्परतेने करून सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व आहेत.त्यांनी असा अचानक घेतलेला निर्णय समस्त सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना धक्कादायक आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी अनेक लोकोपयोगी कामे रस्ते पूल मंदिरे समाज मंदिरे उभारण्यासाठी निधी प्राप्त करून देत सर्वसामान्य नागरिकांची सेवा केली .त्यामुळे सांगली विधानसभा क्षेत्रातील मतदारांची सुधीर गाडगीळ हेच पुन्हा आमदार व्हावेत अशी इच्छा दिसून येते*
आम्ही लोकहित मंचच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ यांना अशी नम्र विनंती करतो की ,हा आपला निर्णय कृपया मागे घ्यावा...
*मनोज भिसे*-*अध्यक्ष,लोकहित मंच,सांगली*