*मुख्य ट्रिमिक्स रस्ता, अंतर्गत सर्व रस्ते व ड्रेनेजमुळे उकरलेले सर्व रस्ते ताबडतोब दुरुस्त करणे बाबत आज कुपवाड शहरातील प्रमुख नगरसेवक शेटजी मोहिते, गजानन मगदूम,विजय घाडगे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शहर अभियंता यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.*
*यावेळी कुपवाड मुख्य ट्रीमिक्स रस्ता पोल शिफ्टिंग व रखडलेले काम पूर्ण करण्यासंदर्भात शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, शाखा अभियंता अशोक कुंभार, विद्युत अभियंता अमर चव्हाण, ठेकेदार मोहन कुंभार व सर्व नगरसेवक यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊन गणेशोत्सवापूर्वी सदर काम पूर्ण करण्यासंदर्भात, तसेच काम सुरू असताना वाहतुकीचे नियोजन करण्या संदर्भात व संत रोहिदास महाराज चौक ते जकात नाका हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.*
*कुपवाड मनपा विभागीय ऑफिसमध्ये सर्व नगरसेवक, कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व संबंधित सर्व अधिकारी यांना महापालिकेतर्फे निमंत्रित करण्याचे ठरले असून सर्वांच्या सामंजस्याने काम लवकरात लवकर व नियोजन पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.. यावेळी नगरसेवक शेटजी मोहिते, गजानन मगदूम,विजय घाडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय खोत, तानाजी गडदे, आशुतोष धोत्रे, अरुण रुपनर तात्या, हनमंत सरगर आदी उपस्थित होते*.