सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन;केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड कार्यालयाचा उपक्रम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/01/2025 6:19 PM

नांदेड  - केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिननिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये मार्गदर्शन, वक्तृत्व्य  स्पर्धा, सेल्फीकबुथ आदींचा समावेश करण्याात आला. 
देशभरात दिनाक 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हमणुन साजरा करण्या्त येत असतो.  यानिमीत्त आठवडाभर विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.  दिनांक 13  जानेवारी रोजी येथील स्वामी  रामानंद‍ तिर्थ यांनी स्थापन केलेल्या सायन्स कॉलेजमध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. शिंदे, उपप्राचार्या डॉ. अरूणा शुक्ला , केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्यी अधिकारी सुमित दोडल, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. गजानन डोणे,  श्रीमती रोहीणी माने आदींची प्रमुख उपस्थीती होती. 
कार्यक्रमांच्या  प्रारंभी प्रा. गजानन डोणे  यांनी “मला समजलेले स्वामी विवेकानंद” या विषयावर उपस्थित विदयार्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये स्वा्मी विवेकानंद यांच्या जिवनप्रवासासोबतच आचरणावर प्रकाश टाकाला. त्यांच्या साध्या  आणि प्रभावी राहणीमानाबददल चे विचार उदाहरणासह मांडले. यामध्ये स्वामी विवेकानंद परदेशात शिकत असतांनांच्या प्रसंगाची उदाहरणे देखील आपल्या मार्गदर्शनातून डॉ. डोणे यांनी दिली. मार्गदर्शनांच्या शेवटी युवकांना भौतीकवाद आणी मोबाईल सारख्याच उपकरणांपासून दुर राहण्याचे आवाहन डॉ. गजानन डोणे यांनी  आपल्या मार्गदर्शनातून केले. 

श्रीमती रोहीणी माने यांनी “मला समजलेल्या मां  जिजाऊ” या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना श्रीमती माने यांनी मां जिजाऊ केवळ शिवरायांच्याा आई तर होत्या च परंतू एक थोर समाज सुधारक देखील होत्या. त्यांचे अंधश्रध्दा निर्मुलन कार्याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे श्रीमती माने यांनी सांगीतले. आपल्या घरात शिवबा जन्माला यायचा असेल तर आगोदर मां जिजाऊ होणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन श्रीमती रोहीणी माने यांनी केले. यानंतर महाविदयाचे  प्राचार्य डॉ. एल.बी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 
मार्गदर्शनाच्याा कार्यक्रमानंतर विदयार्थांच्या  सहभागातून “सद्याच्या स्थीातीमध्ये् युवकांपुढील समस्या  व आव्हाने” आणि “हे जिवन सुंदर आहे या युवकांची भुमिका” या विषयावर वक्तृसत्वी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविदयाच्या 25 पेक्षा जास्ती विदयार्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले. 
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त लावण्यात आलेले सेल्फी बुथ सर्व विधार्थ्यांनी  आकर्षण ठरले. 
कार्यक्रमाचे प्रास्तााविक केंद्रीय संचार ब्यूरो चे प्रसिद्धी अधिकारी सुमित दोडल यांनी केले तर सुत्रसंचलन  प्रा. डॉ. रेखा वाडेकर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या