सां मि कु मनपाचा २६ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/02/2024 9:46 AM

सांगली मिरज कुपवाड शहर महा नगर पालिकेच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त माई घाट येथे आजी माजी नगरसेवक अधिकारी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या संकल्पनेतून हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पालकमंत्री माननीय डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये 1998 पासून ते 2023 पर्यंत सर्व कौन्सिलच्या आजी माजी नगरसेवक निवृत्त अधिकारी याना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमास पालकमंत्री सुरेश खाडे, तत्कालीन उपआयुक्त आणि इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पहिल्या महापौर शैलजा नवलाई, माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, किशोर शहा, विजय धुळूबुळू, कांचन कांबळे, संगीता खोत, माजी आमदार नितीन शिंदे, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, राजेश नाईक, निरंजन आवटी, सुबराव मद्रासी, संतोष पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, राजेंद्र मेथे, आनंद देवमाने, माजी गटनेते भारती दिगडे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, सुबराव मद्रासी, लक्षमन नवलाई, विनायक बर्वे, राजेंद्र कुंभार , गजानन मगदूम, विठ्ठल खोत, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, रोहिणी पाटील, अप्सरा वायदंडे, सरला कांबळे, अनिता व्हनखंडे, ज्योती आदाटे, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सलगर, शेवंता वाघमारे, माजी उपायुक्त श्रीरंग पाटील, रमेश वाघमारे , सुनील नाईक यांच्यासह आजी माझी नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी 26 वर्षाच्या महापालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करीत आपल्या आठवणी जागृत केल्या. कार्यक्रमाचे संयोजन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे, पंडित पाटील यांनी केले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या