कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
गडचिरोली : विदर्भ कंत्राटदार संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दहा लाख आतील सर्व कामांचे निवेदन नोटीस बोर्डवर लावावी अशी मागणी करून त्यासंबंधी कार्यकारी अभियंता यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे. निविदाचे नोटीस कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावून त्याची प्रत कंत्राटदार संघटने कडे देण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना विदर्भ कंत्राटदार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.