*खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्टॉपेजेस मंजूर..* *हजारो नागरिकांचा होणार प्रवास सुखकर : खासदार बाळू धानोरकर यांचे मानले जनतेनी आभार...*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 01/04/2023 9:08 PM

*खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्टॉपेजेस मंजूर..* 

*हजारो नागरिकांचा होणार प्रवास सुखकर  : खासदार बाळू धानोरकर यांचे मानले जनतेनी आभार...* 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात देशातील सर्वच राज्यातील नागरिक काम करीत असतात. त्यांचा स्वगावी जाण्याकरिता अनेकदा रेल्वे गाड्या नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत असते. त्यामुळे ती थांबविण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून हेंद्राबाद - निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. १२७२१-१२७२२   यांच्या थांबा भांदक रेल्वे स्टेशन व चंदीगड मदुराई एक्सप्रेस ट्रेन नं. १२६८७-१२६८८  चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे थांबा देण्याची विनंती केली होती. ती मंत्री महोदयांनी मान्य केली. यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास करणे अधिक सोईचे होणार आहे. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीने देखील आभार मानले. 

          हेंद्राबाद - निजामुद्दीन दक्षिण एक्प्रेसचा थांबा भांदक रेल्वे स्टेशन व चंदीगड मदुराई एक्स्प्रेस चंद्रपूर  रेल्वे स्टेशन येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नातून देण्यात आला आहे. आज हेंद्राबाद - निजामुद्दीन दक्षिण एक्प्रेसचा भांदक रेल्वे स्टेशन येथे पहिल्यांदाच थांबली. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सुजय गावंडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, उपाध्यक्ष संतोष आमने, नगरसेवक चंदू खारकर, सुधीर सातपुते, लक्ष्मण बोधाले, धनु गुंडावार, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, सुधीर परोधे, पिंटू आकोजवार यांची उपस्थिती होती. तसेच चंद्रपूर रेल्वे स्थानकावर  चंदीगड मदुराई एक्स्प्रेस चंद्रपूर  रेल्वे स्टेशन येथे थांबा देण्यात आला आहे. यावेळी या रेल्वेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी,  सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, महिला काँग्रेस शहर अध्यक्षा चंदाताई वैरागडे, कामगार नेते के. के. सिंग, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ताजु शेख, प्रा. अनिल शिंदे, माजी नागरसेक प्रवीण पडवेकर, गोपाल अमृतकर, रेल्वे कमिटी सदस्य राजवीर यादव, राजेश अडूर, अनुसूचित जाती काँग्रेस जिल्हाध्यक्ष निशा धोंगडे,  बालवीर सिंग गुरम, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, अजय बल्की, पप्पू सिद्धीकी, कुणाल चहारे, राजू वासेकर, शपाक शेख, साबीर सिद्दीकी, नौशाद मलन, विशाल नोमुलवार, जुबेर शेख, शिल्पा आंबटकर, जयश्री जाधव, संगीत देठे यांची उपस्थिती होती.        

यावेळी बोलताना खासदार बाळू धानोरकर दळणवळणाची साधने जिल्ह्यात उपलब्ध होण्याची गरज आहे. या दोन रेल्वे गाड्याच्या थांबा मिळाला परंतु यावर समाधानी न होता पुढे देखील असाच प्रयत्न सुरु राहील. त्यासोबतच चंद्रपूर व चांदा फोर्ट रेल्वे स्थानक एकत्र करून मोठे जंक्शन तयार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर - मुंबई व चंद्रपूर - पुणे या दोन रेल्वे गाड्यांची मोठी मागणी आहे. त्यावर देखील मंत्री महोदयासोबत चर्चा झाली असून तिसरी व चौथी लाईन आल्यावर ह्या प्रतिदिवस रेल्वे गाड्या वाढविण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Share

Other News

ताज्या बातम्या