ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*वनश्री महाविद्यालयात संविधान रुजवू देश घडवू कार्यक्रमाचे आयोजन*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/27/2021 3:07:16 PM

स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय 
 योजना विभागाच्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ला संविधान दिवसानिमित्य संविधान रुजवू, देश घडवू या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ विनोद चहारे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा येथील संस्थापक सदस्य शुभदाताई देशमुख, पदमाताई ऊईके व महेश लाडे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील प्रा. विनायक, प्रा. बाराहाते, प्रा. धिकोडी व प्रा. फुंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण व दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यातआली. यावेळी रासेयो स्वयंसेवकांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करुन उपस्थितांना शपथ दिली.
यानंतर  राज्यघटनेने महिलांना अधिकार दिलेले असतानाहीआजही स्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी न होता वाढतच आहेत. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकांना विचार स्वातंत्र्य आहे,असे असतानाही ते विचार चिरडून टाकण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. वास्तविक भारतीय संविधानाने  आपल्याला दिलेल्या अधिकार व कर्तव्यावर ठाम राहिल्यास सर्वजन आनंदाने व सन्मानाने राहून आपली व देशाची प्रगती करु शकतो  असे मत याप्रसंगी शुभदाताई देशमुख यांनी व्यक्त केले. त्यानंतर पदमाताई ऊईके व महेश लाडे यांनीही आपले विचार मांडले.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. फुंडे यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. विनायक यांनी मानले. यावेळी रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Share

Other News