ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मनपा क्षेत्रातील चौक, रस्ते व उध्यानांना भाजपाच्या थोर नेत्यांची नावे ध्यावीत:- भाजपा संगठन सरचिटणीस दिपक माने


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/25/2021 8:25:40 AM

  सांगली मिरज कुपवाड  महापालिका क्षेत्रातील काही रस्ते ,चौक उद्यानांना भाजपच्या होऊन गेलेल्या थोर नेत्यांची नावे द्यावीत.
सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील काही  रस्ते ,उद्यान ,काॅलनी  चौक , मार्ग ,महापालिका इमारती यांना ज्या प्रमाणे काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक  आपल्या आपल्या  नेत्यांचे नाव देण्याचे ठराव प्रत्येक सभेत करत असतात . त्या प्रमाणेच  भारतीय जनता पार्टी चे  तसेच  जनसंघाचे होऊन गेलेले थोर नेते  , ज्यांनी समाजकार्यासाठी  खुप मोठे योगदान दिलेले आहे. असे उदा. स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व‌. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व . प्रमोद महाजन,स्व गोपीनाथ जी मुंडे किंवा अशाच  विचारवंतांचे  नाव देण्यात यावे यासाठी .भाजपचे सभागृह नेते विनायकजी  सिंहासने यांना पत्र देण्यात आले.जेणेकरुन भाजपचे थोर नेते त्यांचे  नाव व त्यांचे महान कार्य  सांगली कर जनतेच्या स्मरणात  निरंतर राहील.  विनायक सिंहासने यांनी लगेच भाजपचे नगरसेवक यांना त्यांच्या त्यांच्या  वार्डातील  प्रस्ताव देण्यास सांगितले जाईल असे सांगितले.

Share

Other News