महापालिका क्षेत्रातील खड्डे सिमेंट काँक्रीटनेच बुजवावे व रस्तेही सिमेंट काँक्रीटनेच करावेत :- जितेंद्र शहा (शिवसेना सांगली)

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/10/2020 3:25 PM

           सांगली महापालिका क्षेत्रात सध्या खड्डे मुजवण्याचे काम महापालिका करीत आहे. पण सदरच्या खड्ड्यात मुरूम टाकल्याने तो खड्डा परत महिन्याभरात उखडतो .त्यामुळे सदरच्या खड्डा सिमेंट काँक्रीट मध्ये भरल्यास रस्त्याचे सौंदर्य वाढणार आहे व खड्ड्याचा प्रश्‍न दीर्घकाळासाठी मार्गी लागणार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

     सांगली मिरज महापालिका क्षेत्रांमध्ये नवीन रस्ते करताना सर्व रस्ते सिमेंट काँक्रेट मध्येच करावेत कारण सदरच्या रस्त्यावर काय होणार ते एकदाच खर्च होऊ द्या, त्यामुळे कायमस्वरूपी खड्ड्याचा प्रश्न पण मार्गी लागणार आहे व रस्तेसुद्धा चांगल्या दर्जाचे होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे व सिमेंटचे रस्ते 20 ते 25 वर्षे टिकणार आहेत त्यामुळे महापालिकेचा रस्त्यावर होणारा वारंवार खर्चाची बचत होणार आहे त्यामुळे इथून पुढे महापालिकेने सिमेंट काँक्रिटचे च   रस्ते बांधणी करावेत व  खड्डे सुद्धा सिमेंट काँक्रेट मध्येच भरावेत.

*जितेंद्र शहा -शिवसेना सांगली
http://jitendrashahshivsena.blogspot.com/2020/10/blog-post_17.html

Share

Other News

ताज्या बातम्या