कुपवाड मधील मेन रोड नविन ट्रिमिक्स रोडला इतर रस्ते जोडण्याचे काम आज चालू करण्यात आले. त्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी उपमहापौर गजाजन मगदूम, शाखा अभियंता अशोक कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड अध्यक्ष आशुतोष धोतरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण रूपनर, हणमंत सरगर, सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर व नागरिक उपस्थित होते.
सदर कामाची पाहणी करून शाखा अभियंता अशोक कुंभार व कॉन्टॅक्टर यांना योग्य त्या सूचना करून काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उपमहापौर गजानन मगदूम यांनी दिले.