जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती समितीसाठी 30 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/07/2026 7:33 PM

नांदेड :- भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कारातुन रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत असल्याने दिसुन येत आहे. लाखों मानसाचे जीव वाचविण्यासाठी त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानस‍िक स्वास्थ सुधारण्यासाठी शासनाने जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमजबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाध‍िकारी, नांदेड यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. 

त्यामध्ये अशासकीय 7 सदस्य (त्यात किमान 2 महीला) व जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती राज्यस्तरीय पीआयएमसी अध्यक्ष व सह अध्यक्ष यांच्या मान्यतेने व आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या सहमतीने करण्यात यावी, असे निर्देश आहेत. 

तरी इच्छुक नागरीकांकडुन एकुण 7 अशासकीय सदस्यांकरीता (त्यात किमान 2 महीला) व 01 जिल्हा समन्वयक यांचेकरीता अर्ज मागविण्यात येत असुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड या कार्यालयात शासकीय कामकाज वेळेत आपला अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

पात्र अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
जादुठोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम घेतलेला किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. -पुरावे जोडण्यात यावे (पेपर कात्रणे व फोटो )
जाहीर  प्रगटन दिलेल्या तारखेपासुन 06 महीन्याच्या कालावधीतील पोलीस चारित्रय दाखला आवश्यक आहे.

स्वता:च्या गावच्या ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांचेकडील चारित्रय दाखला आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता किमान 10 वी उतिर्ण आवश्यक आहे. आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांचे शिफारस पत्र आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्यामधील नांदेड जिल्हयातील रहीवासी असणे आवश्यक आहे. त्याकरीता रहीवासी प्रमाण पत्र (Domicile Certificate) आवश्यक आहे. 02 पासपोर्ट साईजच फोटो अर्जासोबत जोडावे. स्वता:चा परीपुर्ण घरचा पत्ता व संपर्क क्र. अर्जात नमुद करावे. सहायक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे नांवे अर्ज सादर करावे. सदरचे ऑफलाईन अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच आपण अर्ज अशासकीय सदस्यासाठी अर्ज दाखल करीत आहोत कि, जिल्हा समन्वयक करीता याचा स्पष्ट उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2026 आहे. जर आवश्यकता पेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ करण्यात येईल असे समाज कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या