स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समुद्रातील अजरामर उडीचे भगूरला स्मरण

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 08/07/2026 9:48 PM

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समुद्रातील अजरामर उडीचे भगूरला स्मरण 
 भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने स्वा. सावरकर जन्मठिकाण भगूर येथे स्वा.सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात मारलेल्या साहसी उडीला ११६ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी सावरकर स्मारकात सावरकरांच्या मूर्तीस संभाजी देशमुख, गावातील छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस प्रशांत लोया, योगेश बुरके यांनी पुष्पहार अर्पण केला. सूत्रसंचालन मनोज कुवर यांनी केले.
 यावेळी समूहाचे आकाश नेहरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, लंडनमध्ये स्वा. सावरकरांना अटक होणे, स्वा. सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ उडी घेणे आणि त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणे, या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० या दिवशी मोरिया बोटीतून समुद्रात धाडसी उडी मारली आणि ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या संघर्षांची लाट जगाच्या कानाकोपर्‍यात पोचली. जिवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली ही उडी त्रिकालखंडात तर गाजलीच, त्याशिवाय त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची रणदुदुुंभी जगामध्ये निनादली !
या धाडसामागे स्वा. सावरकरांनी बोटीतून मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन पोहत जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला, तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा लाभ घेऊन ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी. याद्वारे त्यांना भारतभूमीच्या सुटकेसाठी मोकळे राहून अन्य देशांत अखंडपणे कारवाया करायच्या होत्या. ब्रिटिशांच्या कैदेत अडकून राहिल्यास स्वातंत्र्यलढ्यात खंड पडेल आणि देशाचे स्वातंत्र्य लांबणीवर जाईल, याच विवंचनेतून त्यांची ती ‘समुद्रझेप’ होती. तो पळपुटेपणा नव्हता; तर तो एक डावपेच होता. ते एक मोठे धाडस होते.
यावेळी समूहाचे भूषण कापसे, सागर पवार, खंडू रामगडे, भाऊसाहेब ससाणे, प्रविण वाघ, निलेश हासे आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या