दिनांक ०६.०७.२०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
तिन्ही रेल्वे मार्ग शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि कामाची कठीण परिस्थिती पाहता, या कामाला काही वेळ लागू शकतो.
अचानक रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना गैरसोय होत होती. त्यामुळे, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी, पूर्वसूचना देऊन रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता, मध्य रेल्वेने खालील कालावधीसाठी खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे:
*१०.०७.२०२६ ते १७.०७.२०२६ पर्यंत दररोज रद्द केलेल्या गाड्या*
१७३१७ हुबळी–दादर एक्सप्रेस
१७३१८ दादर–हुबळी एक्सप्रेस
२२९४४ इंदूर–दौंड एक्सप्रेस
२२९४३ दौंड–इंदूर एक्सप्रेस
२२७३२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)–हैदराबाद एक्सप्रेस
२२७३१ हैदराबाद–सीएसएमटी एक्सप्रेस
१२१२४ पुणे–सीएसएमटी डेक्कन क्वीन
१२१२३ सीएसएमटी–पुणे डेक्कन क्वीन
११००७ सीएसएमटी–पुणे डेक्कन एक्सप्रेस
११००८ पुणे–सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
१२१२७ सीएसएमटी–पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
१२१२८ पुणे–सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
२२१५७ सीएसएमटी–चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल
२२१५८ चेन्नई एग्मोर–सीएसएमटी सुपरफास्ट मेल
*विविध तारखांना सुटणाऱ्या रद्द झालेल्या गाड्या*
१७४११ सीएसएमटी–कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस: १०.०७.२०२६ ते १७.०७.२०२६
१७४१२ कोल्हापूर–सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस: ०९.०७.२०२६ ते १७.०७.२०२६
२०४९५ जोधपूर–हडपसर एक्सप्रेस: १०.०७.२०२६ ते १७.०७.२०२६
२०४९६ हडपसर–जोधपूर एक्सप्रेस: ११.०७.२०२६ ते १७.०७.२०२६
११०२८ सातारा–दादर एक्सप्रेस: ११.०७.२०२६, १३.०७.२०२६ आणि १४.०७.२०२६
११०२७ दादर-सातारा एक्सप्रेस: १०.०७.२०२६, १२.०७.२०२६, १३.०७.२०२६ आणि १७.०७.२०२६
११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस: ०९.०७.२०२६, ११.०७.२०२६, १४.०७.२०२६, १५.०७.२०२६ आणि १६.०७.२०२६
११०४२ साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस: १०.०७.२०२६, १२.०७.२०२६, १५.०७.२०२६, १६.०७.२०२६ आणि १७.०७.२०२६
*विशेष गाड्या रद्द करणे*
०१०७९ सीएसएमटी–गोरखपूर एक्सप्रेस : १०.०७.२०२६ ते १५.०७.२०२६ पर्यंत
०१०८० गोरखपूर–सीएसएमटी एक्सप्रेस : १२.०७.२०२६ ते १७.०७.२०२६ पर्यंत
०१४१५ पुणे–गोरखपूर एक्सप्रेस : १०.०७.२०२६ ते १५.०७.२०२६ पर्यंत
०१४१६ गोरखपूर–हडपसर एक्सप्रेस : ११.०७.२०२६ ते १६.०७.२०२६ पर्यंत
०१४३१ पुणे–गाझीपूर सिटी एक्सप्रेस : १०.०७.२०२६ आणि १४.०७.२०२६
०१४३२ गाझीपूर सिटी–हडपसर एक्सप्रेस : १२.०७.२०२६ आणि १६.०७.२०२६
०१४९१ पुणे–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस : १०.०७.२०२६
०१४९२ हजरत निजामुद्दीन–पुणे एक्सप्रेस: ११.०७.२०२६
मध्य रेल्वेची पथके अहोरात्र काम करत असून, युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
दुरुस्तीच्या कामावर सतत देखरेख ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
रेल्वेच्या कामकाजासंबंधी माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात किंवा एनटीईएस (NTES) ॲप वापरू शकतात. प्रवाशांच्या सोयीसाठी सोशल मीडियाद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती देखील दिली जात आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या तात्पुरत्या व्यत्ययादरम्यान प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि संयम ठेवावा, अशी विनंती आहे.