पत्रकार नगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याला मोकाट कुत्र्याचा चावा! प्रशासनाचे दुर्लक्ष कायम
सांगली: अत्यंत संतापजनक बाब म्हणजे आज पत्रकार नगर परिसरात परीक्षेला जाणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्याला मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासन नेमकं कशाची वाट पाहत आहे? शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन अद्याप गांभीर्याने दखल घेताना दिसत नाहीये.
आमच्या प्रमुख मागण्या:
सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रात मोकाट कुत्र्यांविरुद्ध तातडीने 'कडक मोहीम' राबवावी.
पिसाळलेल्या व हिंसक कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
- मनोज भिसे
अध्यक्ष लोकहित मंच सांगली