डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; 8 ते 14 एप्रिल कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 07/04/2026 7:32 PM

नांदेड :- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्या बुधवार 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयात होणार आहे.

या सामाजिक सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व त्यांच्या अधिनस्त नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात सामाजिक सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या