कोल्हापूर पुणे स्पेशल सह्याद्री एक्सप्रेस ही गाडी नियमित होऊन खडकीपर्यंत धावणार व मुंबई बंगलोर साप्ताहिक स्पेशल एक्सप्रेस १९ एप्रिल पासून धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/04/2026 6:07 PM

करोणा महामारीनंतर रेल्वे प्रशासनाकडुन झिरो टाईम टेबल बेसिक हा प्रस्ताव आणुन कोल्हापुर सोलापुर एक्सप्रेस,कोल्हापुर मणगुरु एक्सप्रेस,कोल्हापुर बिदर साप्ताहिक एक्सप्रेस,मिरज हुबळी लिंक एक्सप्रेस,मिरज पंढरपुर सुपरफास्ट एक्सप्रेस व कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आल्या.

  2023 व 24 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये समितीच्या सदस्यांनी सततची मागणी व पाठपुरावा करून सह्याद्री एक्सप्रेस या गाडीस कोल्हापूर ते पुणे दरम्यान सुरू करण्यास भाग पाडले. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने या गाडीस विशेष दर्जा दिल्याने कोल्हापूर ते पुणे या गाडीचे दर सर्व स्थानकासाठी एक समान असे होते कुठून कुठेही प्रवास जरी केला तरी या गाडीस कोल्हापूर ते पुणे या स्थानकाचे दर द्यावे लागत असे आता ही गाडी खडकी पर्यंत विस्तार करून नियमित करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवाशांना व नागरिकांना विशेष गाडीचे दर आता द्यावे लागणार नाही आता ह्या गाडीस नियमीतचे दर लागु होतील.

आता ही गाडी नियमित होऊन गाडी क्र.11419/20 कोल्हापुर खडकी एक्सप्रेस अशी राहील.

परंतु येथील प्रवासी संघटना सल्लागार समिती सदस्य नागरिक व प्रवाशांकडुन या गाडीचा मुंबई पर्यंत विस्तार करण्यात यावा कारण कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकांना महालक्ष्मी एक्सप्रेस ही एकच गाडी असल्यामुळे या गाडीवर सतत वेटिंगवर अवलंबून राहावे लागते.या गाडीस एल एच बी डबे आल्याने डबे ही कमी करण्यात आले आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे सह्याद्री एक्सप्रेस मुंबई प्रयंत सुरू करण्याच्या मागणीला जोर दिला जात आहे. 

 कोल्हापूर पुणे विशेष (सह्याद्री एक्सप्रेस)या गाडीचा खडकी पर्यंत विस्तार करून नियमित केल्याने रेल्वे प्रशासनाचे आभार असून ही गाडी खडकी पर्यंत विस्तार न करता पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत विस्तार करावे अशी मागणी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केली आहे.

 त्याचबरोबर मध्य रेल्वे कडून येणाऱ्या 19 एप्रिल पासून गाडी क्र. 01013/14 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते बेंगलोर यादरम्यान विशेष साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली आहे ही गाडी प्रत्येक रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी साडेअकरा वाजता सुटेल व मिरज जंक्शन येथे रात्री साडेदहा वाजता पोहोचेल बेंगलोर येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पोहचेल.परतीच्या प्रवासासाठी  बेंगलोर येथून सोमवारी दुपारी एक वाजुन पन्नास मिनिटानी सुटेल मिरज येथे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजून पंचवीस  मिनिटांनी पोहचेल व मुंबई येथे दुपारी दिड वाजता पोहोचेल.

 या गाडीस दादर, ठाणे, कल्याण,लोनावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी,व दावणगिरी आदी ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे.हि गाडी 19 एप्रिल ते 12 जुलै 2026 प्रयंत एकुण 13 फेर्या करेल.

 सध्या उन्हाळी सुट्टी व लग्नसराईचा हंगामा सुरू होत असल्याने मुंबई व बेंगलोर करिता प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सोपान भोरावत, वाय. सी. कुलकर्णी, मधुकर साळुंखे, पांडुरंग लोहार व कुंदन भोरावत यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या