महापौर सौ.कविता संतोष मुळे यांची वृत्तपत्र वितरण सेंटरला सदिच्छा भेट;वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/04/2026 7:19 PM

नांदेड :- महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी नुकतीच शहरातील वृत्तपत्र वितरण सेंटरला सदिच्छा भेट दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ यांनी महापौर कविता मुळे आणि महापौर प्रतिनिधी संतोष मुळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, विसावा उद्यान अधीक्षक मीर्जा बेग,  कर्मचारी कदम, वितरण व्यवस्थापक गणपत बनसोडे, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते सरदारसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी संघटनेने आजवर केलेल्या कामाचा आढावा सादर केला. ते म्हणाले की, "महापालिका प्रशासन तसेच माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण आणि अमरभाऊ  राजूरकर यांनी नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मात्र, अद्यापही काही महत्त्वाचे विषय प्रलंबित आहेत." यामध्ये प्रामुख्याने वृत्तपत्र विक्रेत्यांचा घरकुल योजनेत समावेश, शहरात वृत्तपत्रांसाठी कायमस्वरूपी स्टॉल आणि पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ मिळवून देणे या मागण्यांचा समावेश आहे. महापौरांनी या विषयांत वैयक्तिक लक्ष घालून ते मार्गी लावावेत, अशी विनंती पवार यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना महापौरांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या या कष्टकरी वर्गाच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ तर आभार गणेश वडगावकर यांनी मानले. या प्रसंगी कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, सहसचिव भागवत गायकवाड, संदिप कटकमवार, विठ्ठल फडेवार, निळकंठ सोनटक्के, सत्यनारायण देवरकोंडा, संजय गोते, बालाजी चंदेल, प्रवीण कुलकर्णी, अवधूत पसलवाड, प्रशांत बलगुरी, सत्यनारायण आंधे, सुरेश चितगिरे, शेख उस्मान आदी वृत्तपत्र विक्रेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या