खा. विशाल पाटील यांना परत खासदार करण्यासाठी मायबाप जनता व कार्यकर्ते सक्षम : दिपक माने

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/04/2026 6:24 PM

 सातत्याने भारतीय जनता पार्टी चे काही नेते विशाल दादा पाटील यांना 2029 ला खासदार होऊ देणार नाही अशी वल्गना करत आहे.  टीका करत आहेत त्यांना मी विशाल दादांचा एक कार्यकर्ता म्हणुन सांगणे आहे. सांगली जिल्हा तील जनतेने अपक्ष निवडणूक लढवुन ही विशाल दादांचेवर विश्वास ठेवला व त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. व विशालदादांनी तो विश्वास सार्थ ठरवत लोकसभेत सातत्याने  सर्वसामान्याचे प्रश्न मांडत आहेत.मोठया प्रमाणात विकास कामे करत आहेत. जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन विशालदादा काम करीत आहेत.त्यामुळे सांगली जिल्हा तील तमाम जनता विशाल दादा च्या कामावर समाधानी आहे. त्यांमुळे येणाऱ्या निवडणुकीत विशाल दादांना परत निवडून आणणेसाठी सांगली जिल्हा तील मायबाप जनता व  माझ्या सारखे हजारो कार्यकर्ते सक्षम आहेत. हे भाजप चे नेत्यांनी लक्षात ठेवावे.याफुढे आमचे नेते खासदार विशाल दादा पाटील यांचेवर केलेल्या टिकेला जशास तसे उत्तर दिले जाईल....


# दिपक माने
   -कार्यकर्ता -
खासदार मा.विशाल दादा पाटील

Share

Other News

ताज्या बातम्या