मयूर कदम यांचा ‘रासायनिक शेती’ विषयावर उल्लेखनीय प्रबंध

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/03/2026 8:42 PM

नांदेड : महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर येथील शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी मयूर आनंद कदम याची डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत यश मिळवत पुढील प्रबंध व मौखिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.
मयूरने “रासायनिक शेती : निसर्गासाठी एक हळुवार धोका” या विषयावर प्रकल्प सादर केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या सत्रात त्याने महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी, जिल्हा नांदेड येथे भेट देऊन जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्री बालाप्रसाद बंदेल , श्यांरी गजानन पडलवार, सहायक कृषी अधिकारी च्यासोबत चर्चा केली. जमिनीचा जिवंतपणा जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच मृद प्रयोगशाळेतील माती परीक्षणाची माहिती त्याने घेतली.
दुसऱ्या सत्रात मयूरने कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथे भेट देऊन डेमो प्लॉट व विविध प्रात्यक्षिके पाहिली. तेथील शास्त्रज्ञांशी संवाद साधून रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीविषयी सविस्तर माहिती मिळवली.
तिसऱ्या सत्रात कृषी महाविद्यालय, नायगाव (खै.) येथे उपप्राचार्य श्री नागेश घुबे, प्रा. भद्रे सर, देशमुख सर, जंगीलवाड मॅडम आदींसोबत चर्चा केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून रासायनिक व सेंद्रिय शेती यामध्ये समतोल साधण्याच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन घेतले.
चौथ्या सत्रात तुप्पा शिवारातील शेतकरी श्री कचरू कदम, श्री यशवंत कदम, सौ. पदमीनबाई, सौ. भारतबाई, सौ. उमाबाई आदींच्या शेतावर जाऊन “रासायनिक शेती : निसर्गासाठी एक हळुवार धोका” या विषयावर जनजागृती केली.
या प्रकल्पासाठी श्री दत्तात्रय नारे सर व श्री केशव पाटील सर यांनी माहिती संकलनात विशेष सहकार्य केले. मयूरच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असून त्याच्या पुढील प्रबंध व मौखिक परीक्षेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या