विस्तारीत परिसरात उपमहापौर गजानन मगदूम व उपायुक्त स्मृती पाटील यांचा पाहणी दौरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/02/2026 12:20 AM

मिरज : मिरज विद्यानगर माजी सैनिक विस्तारित परिसर तसेच कुपवाड वॉर्ड क्रमांक दोन, मिरज विस्तारित भागातील विविध नागरी समस्यांची पाहणी करण्यासाठी आज उपमहापौर गजानन मगदूम यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष दौरा केला.
या पाहणी दौऱ्यात उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता चव्हाण, ड्रेनेज व पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुरणे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना भेडसावत असलेल्या ड्रेनेज व पाणीपुरवठ्याच्या समस्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन तपासण्यात आल्या. तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
या भागाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये होती. मात्र आज वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समस्यांची जागेवर पाहणी करून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मिरज देण्याचे योजनेतून जी कामे वगळण्यात आली आहेत अशा कामांचे ड्रेनेज  प्रस्ताव करण्याचे  तसेच या भागात पाणीपुरवठा लाईन टाकलेल्या नाहीत त्या ठिकाणी देखील पाणीपुरवठा लाईन व्यवस्था करण्याची  सूचना देण्यात आली
, माजी सैनिक स्तंभ ते मिरज गव्हर्नमेंट क्वार्टर्स सावली रोडपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या रस्त्यावरील चेंबर उंचीकरण तसेच रस्त्याच्या पातळीतील तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन संबंधित कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीसाठी कामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, असे स्पष्ट निर्देश उपमहापौरांनी दिले.
 यावेळी भागातील   माननीय दिगंबर जाधव माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुरव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे रामचंद्र भोसले संदीप मेथे  कुपवाडे पाटील सर तुकाराम सातपुते रामचंद्र गुरव प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share

Other News

ताज्या बातम्या