लोकप्रतिनिधी गप्प का?, सांगलीच्या जनतेचा आक्रोश..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/02/2026 10:58 AM

​सांगली जिल्ह्याच्या मातीतून निवडून गेलेले आमचे आमदार आणि खासदार नेमकं आहेत तरी कुठे? अनेक अधिवेशने झाली, चर्चा झाल्या, पण आमच्या जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सभागृहात अवाक्षरही उमटताना दिसत नाहीये. जनतेने विश्वासाने निवडून दिलेलं हे नेतृत्व आज शांत का?
​आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Dada Patil) साहेब, आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो की, आपण स्वतः या विषयांत लक्ष घालावे. सांगलीकरांच्या भावना आता अनावर होत आहेत. सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांना सर्वसामान्यांचे हाल दिसत नाहीत का?
​आमचे प्रश्न:
​अधिवेशने संपली, पण सांगलीच्या प्रश्नांचे काय?
​आमदार-खासदार गप्प का आहेत?
​सामान्य जनतेने दाद मागायची कोणाकडे?
​आम्ही फक्त मतं देण्यासाठी नाही, तर उत्तरं मागण्यासाठीही आहोत! आता वेळ आली आहे संघटित होऊन जाब विचारण्याची.


​आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या