नांदेडः मागील सहा वर्षापासून नांदेडकरांची आकर्षण केंद्र ठरलेल्या कुसुम महोत्सवास उदंड प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाची उद्या दि. 1 मार्च रोजी सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांच्या ‘कैलासा लाईव्ह’ कॉन्सर्टने होणार आहे.
कुसुम महोत्सवाची दि. 27 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ‘द फोक मराठी’ या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. 100 कलावंतांच्या संचासह सादर केलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर याच धर्तीवर 28 रोजी ‘कलर्स ऑफ बॉलिवूड फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते.
दि. 1 मार्च रोजी संपूर्ण देशात अबाल-वृध्दांपासून सर्वांची मने जिंकलेले पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‘कैलासा लाईव्ह’ कॉन्सर्ट होणार आहे. याच कार्यक्रमाने कुसुम महोत्सवाची सांगता होईल. कुसुम महोत्सवामध्ये 150 हून अधिक शॅपिंग स्टॉल्स व 50 हून अधिक फुड टॉल्स उभारण्यात आले होते. या दोन्हीलाही नांदेडकरांनी तोबा गर्दी केली आहे.
उद्या दि. 1 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास नांदेडकरांनी मोठया संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन भोकरच्या माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.