सर्वपक्षीय कृती समितीचा पोलीसांच्या सर्व बैठकांवर आणि संवादावर बहिष्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/02/2026 2:50 PM

पोलीसांच्या सर्व बैठका आणी त्यांच्याबरोबरील संवादावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज सर्व पक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पोलीसांच्याकडुन विवीध कार्यकर्त्यांना आलेल्या नोटीसांची होळी सोमवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगली जिल्ह्यात होणारी आंदोलने याची माहीती आंदोलनात आसणारे कार्यकर्ते देत आसतात. काही आंदोलनात पोलीस आंदोलनकर्तात्यांच्या बैठक घेवुन समन्वय करतात आणी आंदोलनकर्ते ऐकत असतात. आणी तरीही पोलीस गुन्हे दाखल करत असतील तर मग पोलीसांच्या बरोबर संवाद करण्याची गरज काय? इथुन पुढे कोणत्याही प्रकारचे आंदोलनासंबंधी  पत्र, बैठक, संवाद साधायाचा नाही, अशी मांडणी उपस्थितीत असलेल्यानी केली. अशी भुमीका घेवुन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रशासन सत्ताधाऱ्यांच्य निषेध करण्यात आला. या आंदोलनाचा भाग म्हणुन सोमवार दि. २ मार्च  2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता रोजी पोलीसांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटीसांची होळी मारुती चोकात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लोकप्रतिनिधींना निवेदन देणे त्यानंतर मोर्चाच आयोजन करणे असे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले.

सतीश साखळकर कॉब्रेड उमेश देशमुख तानाजी सावंत शंभूराज काटकर विराज कोकणे कुलदीप देवकुळे वी द बर्वे नितीन चव्हाण रवींद्र वळवडे आशिष कोरी वसीम मुल्लाकिरण कांबळे उत्तम कांबळे नितीन मिरजकर राकेश दद्दनावर मोहन चोरमुले रेखा पाटील सुजता ताई इंगळे सुवर्णा कोकण योगेश पाटील

Share

Other News

ताज्या बातम्या