मासे गेले आता नंबर माणसांचा? : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/02/2026 10:54 AM

​सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीची आज जी अवस्था झाली आहे, ती पाहून मन हेलावून जात आहे. कारखाने, उद्योग आणि शहरांचे प्रक्रिया न केलेले ९० दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज थेट नदीत मिसळत आहे. परिणामी, हजारो माशांचा मृत्यू झाला असून नदीपात्रात केवळ विष उरले आहे.
​लोकहित मंच, सांगलीच्या वतीने आमचे काही रोकठोक सवाल:
​प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन केवळ नोटीस देण्यातच धन्यता मानणार का?
​मंत्रालयात पडून राहिलेल्या सांडपाणी प्रक्रिया योजनांना मंजुरी कधी मिळणार?
​नदीकाठच्या गावांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ आता थांबणार की नाही?
​कृष्णा नदी केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. जर आज आपण गप्प बसलो, तर पुढच्या पिढीला आपण केवळ प्रदूषित आणि मृत नदी वारशात देऊ.
​प्रशासनाने तात्काळ जागे होऊन यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!

​आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या