*स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सकल हिंदू संमेलन संपन्न*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीत भगूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विश्व हिंदू परिषद केंद्रीय समिती सदस्य श्री एकनाथराव शेटे सर यांनी संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीचा इतिहास मांडला.त्यानंतर श्री जितेंद्र भावसार सर यांनी वैयक्तिक गीत सादर केले.प्रमुख पाहुणे म्हणून रा.स्व.संघाचे नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख श्री कृष्णाजी घरोटे,श्रीमती नयनाताई देशमुख,ह.भ.प.गणेश महाराज करंजकर
ह.भ.प.साक्षीताई पळसकर
ह.भ.प.आदित्य महाराज करंजकर,छत्रपती शिवाजी महाराज इतिहास अभ्यासक चि. वेदांत करंजुले उपस्थित होते.
कृष्णाजी घरोटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली ह.भ.प.गणेश महाराज करंजकर यांनी हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून संस्कार आणि निसर्ग संवर्धन शक्तीची भावी काळातील आवश्यकता लक्षात आणून दिली.
कार्यक्रमास भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ प्रेरणा विशाल बलकवडे,उपनगराध्यक्ष प्रसाद अंबादास आडके तसेच सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविका,सावरकर जयंती उत्सव समिती,सावरकर फेसबुक समूह,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती,भगूर परिसर विविध मंदिर समिती,जेष्ठ नागरिक संघ,वारकरी भजनी मंडळ,विविध व्यापारी संघटना,ईच्छापूर्ती शिवमंदिर समिती लहवित रोड भगूर,जय शिव क्रांती मित्र मंडळ,देवळाली-भगूर पत्रकार संघ,वीर सावरकर जन्मभूमी मित्र मंडळ,सर्व राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भगूर पंचक्रोशीतील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल हिंदू समाज भगूर समितीने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलासजी म्हसाळ सर यांनी व आभार डॉ.मृत्युंजय कापसे यांनी मांडले.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक पसायदानाने झाला.