ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

संवाद ठेवा ....कनेक्ट वाढवा...स्वःतासोबत ...जगासोबत...आणि माझ्यासोबतसुध्दा..:- तुकाराम मुंढेची भावनिक साद


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/22/2020 10:01:14 PM

Connect...

नमस्कार..!

बरेच दिवस झाले. नागपूरहून मुंबईला परतल्यानंतर आपल्याशी संवाद झाला नाही. अनेक विचार डोक्यात आहेत. याच विचारांना घेऊन आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय.

आपण आपल्यावर प्रेम केलेच पाहिजे.आपण प्रत्येकजण काही उद्दिष्ट घेऊन जगतो आहे. हे करत असतानाच आपण स्वतःशी कनेक्ट होणे गरजेचे आहे. कनेक्ट होण्यासाठी संवाद गरजेचा आहे. संवाद हा आपल्याला स्वतःशी आणि इतरांशी कनेक्ट करतो. जेव्हा^ आपला स्वतःशी संवाद वाढेल तेव्हा आपण स्वतःशी आणि जगाशी कनेक्ट होऊ.  प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंद, प्रेम आणि करुणा हे स्वभावगुण आहेत. या मूळ गुणांशी, मूळ विचारांशी कनेक्ट झालात तर जगासोबत कनेक्ट व्हाल. स्वतःसोबत आणि जगासोबत कनेक्ट होताना महत्त्वाच्या गोष्टीना प्राधान्य देणे आवश्यक आहे. 

जागतिकीकरण, बाजारीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एकटेपणा वाढला आहे. या एकटेपणाला डिसकनेक्ट करा... 

संवाद ठेवा...कनेक्ट वाढवा..स्वतःसोबत.... जगासोबत....आणि....माझ्यासोबतसुद्धा ...!

Stay Safe, Stay Connected...!

Share

Other News