बार्न्स स्कुल आणि ज्युनियर कॉलेज देवळाली येथे १००वा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
२०२५च्या १०वी आणि १२वी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना माजी अॅडमिरल करमबिर सिंग पीवीएएम एवी एसएम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला .माजी अॅडमिरल करमबिर सिंग हे बार्न्स स्कुल चे १९७५चे विद्यार्थी होते .या वेळी प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले आणि शाळेचा वार्षिक अहवालाचे वाचन करून शाळेच्या १०० वर्षाच्या यशस्वी इतिहास सांगितला.
२०२५ या वर्षी १०वी आणि १२वी चा १००% निकाल लागला असून शाळेसाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे .
माजी अॅडमिरल करमबिर सिंग यांनी या वेळी आपल्या शाळेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला .विद्यार्थी हेच शाळेचा श्वास आहे त्यांच्या शिवाय शाळा नाही. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा भाग्यशाली आहे की त्याला या शाळेत शिक्षण घेता येत आहे.मी सुद्धा या शाळेत शिकलो मी सुद्धा भाग्यवान ठरलो . प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाते हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे हे त्यानी आवर्जून सांगितले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाळा कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले .