कुपवाड शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी कुपवाड शहर राष्ट्रवादीच्या वतीने सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब यांना शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे सर व युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांचे निवेदन देण्यात आले. सध्यास्थितीत कुपवाड शहर व परिसराततील गुन्हेगारीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कुपवाड शहर व परिसरामध्ये रहिवासी नागरिकांना लहान मुले-मुली स्त्रिया, पुरुषांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात या वाढत्या गुन्हेगारीचा त्रास होत असून लोक भयभीत जीवन जगत आहेत. दिवसेंदिवस कुपवाड शहर व परिसरामध्ये खून मारामाऱ्या चोऱ्या नशीखोरांचे तसेच अवैध तस्करीचे प्रमाण वाढले आहे. योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच एमआयडीसी कुपवाड येथील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांची योग्य ती चौकशी करून त्यांना कामावर ठेवण्यात यावे. अशा सक्त सुचना कारखानदारांना द्याव्या. तसेच कुपवाड शहर परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्तीवर व काही टोळ्या कुपवाड शहर व परिसरात कार्यरत असून त्यांच्यावर योग्य ती पकारवाई आपल्या मार्फत योग्यती कारवाई करावी किंवा समज द्यावी. कुपवाड शहर व परिसरांमधील रहिवासी नागरिकांच्या जिवितास गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुपवाड शहर व परिसरातील रहिवासी नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे.
तसेच कुपवाड परिसरातील शाळा व महाविद्यालय मध्ये आपल्या मार्फत अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये म्हणून प्रबोधनात्मक उपाययोजना करण्यात यावे.
तरी कुपवाड शहर व परिसरातील गुन्हेगारी मारामारी, चोऱ्या, तस्करी, नशेखोर, अवैध तस्करी करणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करून कुपवाड शहरात व परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी तसेच गुन्हेगारी मुक्त कुपवाड शहर करावे हे आपणास नम्र विनंती आहे.
यावेळी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण रुपनर, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागर माने, युवक अध्यक्ष दादासो कोळेकर अल्पसंख्यांक शहर जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर, विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष तोहीद फकीर, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष अमोल धोतरे, विजय खोत, ओबीसी शहरजिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, कुपवाड महिला अध्यक्ष सुनीता जगधने, आशिष वाघमारे, आयुष आठवले, सौरभ मराठे, साहिल मोठे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.