गेल्या अकरा वर्षापासून नगरसेवक गजानन मगदूम शिवप्रेमी मंडळ व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती कुपवाड यांच्यामार्फत मिरज ते पंढरपूर पायी दिंडी चालणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाण्याचे व फराळाचे वाटप केले जाते याचा शुभारंभ सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर साहेब हरिभक्त परायण निवृत्ती महाराज साईमोते यांच्या शुभहस्ते पार पडला
यामध्ये बिसलरी पाणी लाडू बिस्किट तसेच केळी अशा स्वरूपात फराळाचे वाटप दरवर्षी आषाढी वारी निमित्त केले जाते यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक तरुण व मित्रमंडळी यांचा सहभाग असतो कुपवाड शहरात राबवला जाणाऱ्या उपक्रमाबद्दल बोलताना दीपक भांडवलकर साहेब म्हणाले की तरुण पिढी व्यसनापासून मुक्त होण्यासाठी सदरचा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा असून त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ग्रंथराज न्यानेश्वर पारायण समितीचे अध्यक्ष दादासाहेब पाटील गंगाधर पाटील शिवगोंडा पाटील राजेंद्र पाटील मैना बापू रावसाहेब पाटील दादासाहेब पाटील रमेश कुंभार भाऊसाहेब पाटील सी आर पाटील अनिल पाटील शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील राहुल सरगर योगेश तोडकर अभिजीत परीट योगेश हिंगमिरे दिनकर चव्हाण अरुण रुपनर सतीश भाऊसाहेब पाटील बाळासाहेब दीक्षित विजय दादा खोत तसेच कुपवाड शहरातील ठोकीदारक संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.