आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
16 वर्षांची पंरपरा ; 40 दिंडीतील सहा हजार वारकऱ्यांची सेवा
दहिवडी दी.: माऊली...माऊलीचा गजर करत राज्यभरातून लाखो भाविक आपल्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी पायी वारी करत पंढरपूरकडे जात आहेत.सातारा पंढरपूर रस्त्यावरूनही 40 दिंडीतील सहा हजार वारकरी पायी वारी करत असतात.याच रस्त्यावरील उकिर्डे ता.माण घाटात विठ्ठल मळा येथे एमआयडीसीचे सेवानिवृत्त सहमुख्य कार्यकारी अधिकारी व कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व त्यांचे कुटुंबियानी गेली 16 वर्षांची परंपरा अबाधित ठेवत दिंडीतील पायी वारी करणाऱ्या सहा हजार वारकऱ्यांना चहा , नाश्ता,पाणी,जेवण देऊन सर्वसोयीनियुक्त राहण्याची सोय करून वारकऱ्यांची सेवा करत आहे.आषाढी वारीदरम्यान या विठ्ठल मळ्यात आलेल्या वारकऱ्यांमुळे विठ्ठल मळ्याला मिनी पंढरपूरचे चित्र निर्माण झाले होते.
सुभेदार कुटुंबिय पूर्वीपासूनच विठूमाऊलीचे भक्त असून स्व.जगन्नाथ सुभेदार व स्व.शशिकला सुभेदार यांना विठूमाऊलीं विषयी प्रचंड प्रेम होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मळ्यालाही विठ्ठल मळा असे नाव दिले होते.विठूमाऊली व वारकऱ्यांची सेवा करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.पायी वारीसाठी निघालेल्या दिंडीतीली वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी कायम ते आतुरलेले असायचे.त्यांचाच वारसा पुढे नेण्याचे काम एमआयडीसीचे सेवानिवृत्त सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आपली पत्नी सौ.रोहिणी सुभेदार करताना दिसून येत आहेत.विठ्ठल मळ्यात 18 दिंड्यांचे स्वागत करत वारकऱ्यांच्या राहण्याची सोय करून त्यांच्या चहा ,नाश्ता ,जेवणाची सोय केली होती.तर रस्त्यावरील 22 दिंड्यांतील वारकऱ्यांना पाणी, चहा, नाश्ता ची सोय केली होती.त्यामुळे विठ्ठल मळा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.दिवसेंदिवस दिंड्या वाढत असल्याने विठ्ठल मळ्यात भाविकांचा मेळा भरत आहे.
यावेळी सलग पाच दिवस सुभेदार कुटुंबिय वारकऱ्यांच्या सेवा करत होते.होते.दिवसेंदिवस वाढत्या दिंड्याची सेवा ते रत आहे करण्याचे भाग्य त्यांना मिळत आहे.
- वारकऱ्यांची सेवा हे मोठे वैभव...
हजारों वारकऱ्यांची सेवा करण्याचा वारसा आम्हाला आमच्या आजोबा,आई-वडीलांकडून मिळाला आहे.ते विठूमाऊलींचे मोठे भक्त होते. नेहमी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचीही सेवा करत असत.त्यांच्याच कार्याचा वारसा गेली 16 वर्षे आम्ही पुढे नेतोय.वारकऱ्यांची सेवा करण्याचे हे मोठे भाग्य आम्हाला मिळत असून हे सर्वात मोठे वैभव आहे.
- अविनाश सुभेदार ,माजी जिल्हाधिकारी कोल्हापूर
- वारकऱ्यांच्यात आम्ही विठूमाऊली पाहतो...
आषाढी वारी दरम्यान विठ्ठल मळ्यात वारकऱ्यांचा पदस्पर्श होतो हे आमचे भाग्य आहे.त्यांच्या रूपाने विठूमाऊलींची सेवा करता येतेय.प्रत्येक वर्षी या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो.या सेवेत आमचे पै पाहुणे,मित्र मंडळी ही सहभागी होत असतात.या मार्गावरून जाणाऱ्या सर्व दिंडीतील भाविकांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहील.
- सौ.रोहिणी सुभेदार
- विठ्ठल मळ्यातील विठूमाऊलींची मूर्ती ठरतेय आकर्षण...
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी व सेवेसाठी विठ्ठल मळ्यात भव्य कमान,सजावट,रांगोळी,रोषणाई करण्यात आली असून विठूमाऊलींची मूर्ती आकर्षण ठरले आहे.भाविक भक्तगण त्या मुर्तीसोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करत होते.
- उकिर्डे ता.माण घाटातील सुभेदारांच्या विठ्ठल मळ्यात आलेले वारकरी...