गटारावरील चेंबर उघडे, नागरिकांचा जीव धोक्यात...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/06/2025 5:34 PM


        सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक अतिक्रमाने रस्त्यावर झाल्याने अपघातांमध्ये वाढ झाली असून, या अतिक्रमणाबरोबरच रस्त्यावरील अंडरग्राउंड ड्रेनेजच्या  चेंबरची झाकणे खराब झाल्याने सदर ड्रेनेज उघडे पडल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.              
 महापालिका क्षेत्रातील  तरुण भारत स्टेडियमच्या गेटच्या समोर कॉर्नरवर अशा प्रकारचे उघडे चेंबर आहे. सदर चेंबर बरोबर वळणावर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी ते धोकादायक बनले आहे.                      
         महानगरपालिका प्रशासनाने अशी उघडी चेंबर शोधून त्यावर ताबडतोब झाकणे लावावीत. अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत.     
        सिविल चौकावरील अतिक्रमणामुळे दोनच दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. एखादी दुर्घटना घडल्यावरच उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच समस्यांकडे डोळे उघडून बघणे कधीही हितकारकच ठरेल.                          
*एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?*                       

*मनोज भिसे अध्यक्ष- लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या