प्रती
मा. आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
विषय: - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय, प्रभाग समिती 1,2,3,4 मधील मजूर सहकारी सोसायटी नावावरील चालू असलेल्या कामाबाबत
महोदय
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय, प्रभाग समिती क्रमांक 1,2,3,4 माध्यमातून मजूर सहकारी सोसायटी च्या नावावर कामे काढली जातात
सदर मजूर सहकारी सोसायटी चे मूळचे सभासद आहेत त्यांनी स्वतः काम करायचं असा शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी आपले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती मार्फत अंमलबजावणी केलेली जात नाही
कारण सदर मजूर सहकारी सोसायटी या टक्केवारी घेऊन कामे इतर कॉन्टॅक्ट न देतात याबाबत चालू असलेली व भविष्यात कार्यारंभ आदेश घेऊन करण्यात येणाऱ्या सर्व कामगार त्याच मजूर सोसायटीतील मधील मजूर ओळखपत्र लावून काम करतात का नाही याची चौकशी करून त्याचे रेकॉर्ड तयार करण्यात आले पाहिजे असा नियम आहे
शासन नियमानुसार त्याच मजूर सोसायटीचे मजूर काम करताना नसतील तर सदर मजूर सहकारी सोसायटीचा रिपोर्ट घेऊन ब्लॅकलिस्ट करण्याचा नियम आहे त्याचे अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती आहे
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा