राज्यात आणि मुख्यतः उत्तर महाराष्ट्रात व कोकणातील देखील बहुतेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची काल किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी शिष्टमंडळासह तातडीने संगमनेर येथे राजहंस दूधसंघात भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याची विनंती केली.
राज्यात शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक या मानसिक परिस्थिती खालवली आहे. कांदा निर्यातीवर बंदी, शेतकरी नुकसान भरपाई वंचित, पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. खरीप हंगामाची पूर्ण पिके शेतकऱ्याचा हातातून गेली. अतिवृष्टी मुळे "शेत शिवार रस्ते" समस्या, शेती शिवार रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.भूसंपदांचे आरक्षण, खातेफोड अडचणी, भूमापन अद्यावत पद्धतीने व्हावी, शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा व भारनियमन तसेच , नवीन कनेकशन त्वरित द्यावे, देशभरात कांदा निर्यात बंदी उठवन्यासाठी केंद्रशासनास साकडे घालावे, कापसाचा भाव असे विविधांगी अभ्यासपुर्ण मुद्दे श्री. पष्टे यांनी महसूलमंत्री ना. थोरात यांच्या समोर मांडले.
येत्या काही दिवसांत किसान कॉंग्रेस पदाधिकारी व महसूल, क्रुषि, ऊर्जा मंत्रीमहोदय व प्रशासकिय अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार असून त्यातच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन ना. थोरात यांनी किसान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना दिले.
एक-दीड तास चाललेल्या सदर बैठकीस प्रदेश सरचिटणीस युवराज आबा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स. का. पाटील, नंदुरबार सरचिटणीस गणेशराजे पाटील, पालघर अध्यक्ष पुंडलिकराव घरत, जळगाव अध्यक्ष सुरेशदादा पाटील, नाशिक अध्यक्ष संपतराव वक्ते, धर्मराज जोपळे, धुळे अध्यक्ष शामकांत भामरे, कपिल जाधव यांसह प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.