प्रारूप प्रभाग रचना २२९ हरकतीवर सुनावणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2025 8:55 PM



मा सत्यम गांधी आयुक्त, 
सुशांत खांडेकर अप्पर जिल्हाधिकारी सांगली , श्री रघुनाथ पोटे उप जिल्हाधिकारी,सांगली,अति. आयुक्त राहुल रोकडे ,अश्विनी पाटील उप आयुक्त मनपा सहा संचालक नगररचना विक्रम गायकवाड   यांच्या उपस्थितीत सांगली येथील डॉ वसंतदादा पाटील सभागृहात आज दि १८/९/२०२५रोजी प्रारूप प्रभाग रचना हरकती बाबत सुनावणी  घेण्यात आली आहे.

प्रारूप प्रभाग रचनाबाबत एकूण २२९ हरकती  प्राप्त झाला आहेत त्या पैकी

 १)निवडणूक कक्ष मुख्य इमारत *५९* ,

२)प्रभाग समिती क्र१-
 *१* 

३)प्रभाग समिती क्र २-
 *१* 

४)प्रभाग समिती क्र ३-- *१५८* 

५)प्रभाग समिती क्र ४-- *१०* 

अश्या मनपा क्षेत्रातील *२२९* हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्या वर सुनावणी झाली आहे,

साधारणपणे वार्ड रचना लोकसंख्येच्या विचार करून रचना करावी , भोगोलिक रचना विचारात घेऊन प्रभाग रचना करावी अशा हरकती घेण्यात आल्या आहेत, 

सदर हरकती बाबत मा नगर सचिव विभाग  महाराष्ट्र यांच्या कडे दि २५/९/२०२५पर्यत सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे, मा नगर विकास विभाग महाराष्ट्र, यांच्या मार्फत  मा राज्य  निवडणूक आयोगाने यांच्या अहवाल सादर होणार   आहे .
मा राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार आहे, 


Share

Other News

ताज्या बातम्या