*तर समाजवादी न.पा.कार्यालय*
*आवारात मोकाट कुत्रे सोडणार !!*
पालिका प्रशासनाने शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित योग्य बंदोबस्त करावा
अन्यथा नगर पालिका कार्यालय आवारात कुत्रे सोडो आंदोलन - जोएफ जमादार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या सध्या प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने शहरातील नागरीकांना मोठ्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे,
श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने यावर तात्काळ योग्य उपाय योजनांचा अंमल करुन शहरवासीयांना या त्रासापासून मुक्त करावे, अन्यथा समाजवादी तर्फे नगर पालिका कार्यालय आवारात कुत्रे सोडो आंदोलन हाती घेण्यात येईल असे समाजवादी पार्टीचे नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी मुख्यधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सध्या श्रीरामपूर शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण खुपच वाढले असून त्यावर श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कोणतीही उपाय योजना तथा योग्य नियंत्रण होत नसल्याचे आढळून येत असल्याने शहराच्या सर्वच परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः प्रचंड प्रमाणात हैदोस घातला असल्याचे दिसून येत आहे.
नगर पालिका प्रशासन शहर वासियांकडून नेहमी आवश्यक सर्व प्रकारचा कर गोळा करते. त्यामुळे नागरी समस्यांचे निवारण आणी निराकरण करणे,नागरीकांना त्रासापासून मुक्त करणे हे देखील नगर पालिका प्रशासनाचे काम असते, मात्र सर्व काही वेळेवर घेऊन परतीत मनस्ताप देत, उलटे पांग फेडण्याचे धोरण जर नगर पालिका प्रशासन राबवत असेलतर हे सर्रास चुकीचे ठरणारे आहेत, कारण या मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले असून या मोकाट कुत्र्यांच्या सर्वत्र मुक्त संचारामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे,
या मोकाट कुत्र्यांच्या चावण्याने निरपराध नागरिकांच्या जीवीतास काही बरे वाईट झाले तर याची जबाबदारी कोणाची ? नगर पालिका प्रशासन ही जबाबदारी घेणार का ?, भरपाई देणार का ?, असे एक ना अनेक प्रश्न सध्या या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र इतकं काही घडुनही जर नगर पालिका प्रशासन निद्रावस्थेची भूमिका घेत असेलतर नाविलाजास्तव शहरातील सर्व मोकाट कुत्र्याना पकडून नगर पालिका कार्यालयाच्या आवारात सोडणे भाग पडू नये याकरिता संबंधित नगर पालिका प्रशासनाने आपले स्तरावरुन सदरील प्रश्नी योग्य निर्णय घेऊन उचित कार्यवाहीचे आदेश देत या मोकाट कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा,अन्यथा नगर पालिका कार्यालय आवारात कुत्रे सोडो आंदोलन हाती घेतले जाईल असा इशाराही समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
यावेळी रिजवान बागवान, दानिश शाह,सलीम शेख, शोएब शाह,कलीम शेख, मुश्ताक शेख,मकसूद मिर्ज़ा, इमाम शेख,शहेज़ाद शेख, सलमान शाह आदि उपस्थित होते.