कुपवाड मेन रोडवर गतिरोधक नसल्यामुळे वाहने प्रचंड वेगात लोक चालवत असतात. शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना आपले जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. वाहने प्रचंड वेगात असल्यामुळे या रोडवर छोटे-मोठे बरेच अपघात झाले आहेत. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुपवाड मेन रोडवर गतिरोधक तसेच मेन रोडवर वाहनांना वेगमर्यादा ठरवून त्याचे फलक रोडवर लावण्यात यावे. याचे निवेदन देण्यात आले.
कुपवाड महानगरपालिका कार्यालयातील सहाय्यक आयुक्त साहेब नेहमीप्रमाणे आज देखील गायब होते. म्हणून निवेदन त्यांच्या केबिनच्या बाहेरील वरिष्ठ लिपिक खाडे साहेब यांना दिले.
यावेळी कुपवाड राष्ट्रवादी शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, युवक शहर जिल्हा सरचिटणीस मुद्दसर भाई मुजावर, कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण तात्या रुपनर, युवकचे कुपवाड शहराध्यक्ष दादासो कोळेकर, अल्पसंख्यांचे दाऊद मुजावर, अजय कोरे इत्यादी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.