रेल मदत व हेल्पलाईन 139 चा प्रचार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून १ ऑगष्टपासून विशेष मोहीम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/07/2025 8:26 PM

   'रेल मदत' आणि हेल्पलाइन 139 बाबत जनजागृती मोहीम – प्रवाशांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी एक उपक्रम
मध्य रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रवासी हित अनुकूल सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याचाच भाग म्हणून 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान रेल मदत – भारतीय रेल्वेची एकत्रित तक्रार निवारण प्रणाली – आणि राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 139 याचा प्रचार करण्यासाठी एक विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
रेल मदत हे एक केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे प्रवासी रेल्वेच्या सेवा, स्वच्छता, खाद्यसेवा, डब्यांची स्थिती आणि इतर सोयी-सुविधांबाबत आपली तक्रार रीयल टाइम मध्ये नोंदवू शकतात व तिचे निराकरण मिळवू शकतात. प्रवासी 139 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल किंवा SMS करून, RailMadad मोबाईल ॲप, अधिकृत वेबसाइट, ई-मेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी नोंदवू शकतात. यामध्ये हेल्पलाइन 139 हा सर्वाधिक सोपा व वापरण्यास सुलभ पर्याय ठरलेला आहे.
या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना RailMadad प्रणालीच्या सहजते विषयी, उपलब्धते विषयी आणि कार्यक्षमते विषयी माहिती देणे आहे. या अंतर्गत महत्त्वाच्या स्थानकांवर व गाड्यांमध्ये माहितीपत्रके, सार्वजनिक घोषणांद्वारे तसेच थेट संवादाद्वारे प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल.
प्रवाशांनी RailMadad आणि हेल्पलाइन 139 चा अधिकाधिक वापर करून आपले अभिप्राय व तक्रारी नोंदवाव्यात आणि भारतीय रेल्वेला सेवा सुधारण्यात सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन करण्यात येते.

Share

Other News

ताज्या बातम्या