अधिवेशनमध्ये रमी खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका : शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/07/2025 12:49 PM

महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती देशोदढीला लागली असताना अनेक शेतकरी कर्जबाजारी मुळे आत्महत्या करत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या वर सावकारी व बँकेचे कर्जे आहेत. असे असताना महाराष्ट्राचे कृषिमंत्री अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर उपाययोजना करण्याचे सोडून रमी खेळण्यात मग्न आहेत असे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले..
महाराष्ट्राचे कृषिमंत्री अनेक वेळा शेतकऱ्यांचे बदनामी करून शेतकऱ्यांच्यावर अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्ये केली. सत्तेतील अनेक आमदार मंत्री शेतकऱ्यांच्यावर अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यांना  सरकार का पाठीशी घालत आहे..?
महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना रमी खेळण्यासाठी वेळ कमी पडत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मंत्रिपदावरून पदमुक्त करा भविष्यात त्यांना रमी खेळण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल..
रमी.जुगार.मटका अशा अनेक बेकायदेशीर धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहेत. या कृषी मंत्र्यांना महाराष्ट्राला युवा पिढीला युवा शेतकऱ्यांना कोणता संदेश द्यायचा आहे..?
मागील विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फसव्या घोषणाच काय झालं..?शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व कर्जमाफी साठी अनेक शेतकरी बांधव अनेक संघटना रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करत आहेत त्या संदर्भात कृषिमंत्र्यांनी कोणती ठोस भूमिका घेतली.. मुख्यमंत्र्यांनी समिती नेमुन ही वेळ काढू पणा करण्याची नवी संधी शोधली..
अनेक ठिकाणी शक्ती पिठाचे नवीन महामार्ग करून अनेक शेतकऱ्यांचे जमिनी जबरदस्तीने  सरकार ताब्यात घेत आहे.. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला का घाबरते..?
समितीच्या अहवालाची वेळ वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.. त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी.. सरकारमधील अनेक मंत्री व वाचाळवीर आमदार हे शेतकऱ्यांचे बदनामी करून अनेक मुक्ताफळे उधळत आहेत सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.. व नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधी भुमिका घेणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची लवकरात लवकर मंत्रीपदावरून हकालपट्टी करा.. अशी मागणी शिवसेना युवा नेते तथा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या