राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात मुलींसाठी* “*सक्षम तू*”* हा कार्यक्रम राबवणात येत आहे .
या अनुषंगाने आज भगूर शहरात टी. झ विद्यामंदिरातील विद्यार्थीनींसाठी कार्यक्रम आयोजीत केला होता. देवळाली पेलीस उपनिरिक्षक मिताली कोळी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना कायद्याविषयी माहिती देत असताना सतर्क राहून महिलांसाठी असलेल्या सुविधा बिट मार्शल व दामिनी पथक याची माहिती पोलिस उपनिरिक्षक कोळी मॅडम यांनी दिली. येत्या सप्ताहात इतर शाळा व महाविद्यालयांमध्ये देखील हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.
हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबवण्यात येणार असुन यामध्ये शाळा/ कॅालेजमध्ये जाऊन पोलिस डिपार्टमेंटच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, कायदे, पोक्सो,टोल फ्री नंबर, समुपदेशन, बीट मार्शल व दामिनी पथक ही माहिती देण्यात येणार आहे.
*आज वयात येत असताना मुलिंना असेत प्रसंगांना सामोरी जावे लागते. मुलिंवर होणाऱ्या अत्याचार, छेडछाडीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मुलींची दिशाभुल होऊन मुली चुकिच्या मार्गावर जाऊ नये यासाठी समउपदेशन ही काळाची गरज आहे. याची सुरवात शालेय जिवनात मुली वयात येत असताना झाली पाहिजे व त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन तालुकावार करणार असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले. आपल्या जिल्ह्यातील मुली सुरक्षीत रहाव्या या साठी उचललेले हे छोटेसे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले सौ प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले