संत निरंकारी सत्संग संगमनगर च्या वतीने 10 वी आणि 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या एकूण 20 विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा मिळावी ह्या हेतुने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रमुख उपस्थिती ॲड. गायत्री कांबळे जी म्हणाल्या
*"मानवाचं होईल भलं. जर का एकोप्याने राहता आलं"*(निरंकारी बाबा हरदेवसिंह जी महाराज)
शिक्षणा बरोबर आजच्या युवा पिढीला आध्यात्माची खुप गरज आहे. शिक्षणामुळे मानव एकत्र येतो आणि एकत्र आला की अन्यायाविरुद्ध संघर्ष करतो. खरया अर्थाने आजच्या युवा पिढीने काम. क्रोध मद मोह मत्सर आणि अहंकार या षडविकारा विरूध्द संघर्ष केला पाहिजे. . म्हणजे मी जन्माला आलोय कशासाठी आणि मला काय करायचे आहे. आणि जाताना काय घेऊन जायचे आहे. हे आध्यात्म शिकवत. म्हणुन आध्यात्म ही युवा पिढीसाठी काळाची गरज आहे.
विशेष उपस्थिती. संत निरंकारी सत्संग चे सेक्टर संयोजक जालिंदर जाधव जी व गितकार प. आ. राजेंद्र क्षीरसागर जी, प्रा. अविनाश साळुंखे जी, शशिकांत रायजादे जी, देवराज काळे जी, यशवंत गायकवाड, तानाजी व्हनमाने व प्रचंड संख्येने महात्माजी व बहेणजी उपस्थित होते.