प्रति
मा. जिल्हाधिकारी सो
सांगली जिल्हा
विषय :- सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बंद अवस्थेत असलेल्या वॉटर एटीएम बाबत
महोदय,
आपल्या सांगली जिल्हाअधिकारी कार्यालय मध्ये शुद्ध पाण्याच्या साठी वॉटर एटीएम बसवण्यात आले आहे मात्र सध्या ते धूळ खात अडगळीत पडलेले दिसत आहे.
याबाबत योग्य ती चौकशी करून सदर वॉटर एटीएम चालू करावे व येणाऱ्या अभ्यागत व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी विनंती आहे
या जिल्हाधिकारी कार्यालयात अशा पद्धतीने जर शासकीय पैशाचा अपव्य होत असेल तर अखंड जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये काय परिस्थिती असेल याबाबत सर्व जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय मधील अशा प्रकारे खर्च करण्यात आलेल्या वस्तूंची परिस्थिती काय आहे याचे एक ऑडिट करावे जेणेकरून ज्या उदात्त उद्देशासाठी अशा वस्तू बसवण्यात आल्या आहेत त्याचा उदेश तपासण्यात यावा अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.