आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
-पोलीस अधीक्षक तुषार दोशी
सातारा दि.- सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे उद्योग व व्यवसाय अधिक चांगल्यारितीने वृध्दंगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलील दल सदैव तत्पर राहून सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या समस्या व अडीअडचणी व त्यावर करावयाच्या योजनांच्या संबंधाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या अध्यक्षतेखाली अलंकार हॉल सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, कराड उपविभागीय अधिकारी अमोल ठाकुर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, महाराष्ट्र औद्योगिक संघटनेचे (मास) अध्यक्ष संजोग मोहीते, उपाध्यक्ष अनुप मुथा, सचिव दिपक पाटील उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील उद्योजकांनी मांडलेल्या अडचणींबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनेबाबत पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी चर्चा करुन डायल 112 बाबत माहिती देऊन याचा जास्तीत जास्त वापर करण्यास सांगितले. आद्यौगिक परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत आणण्याबाबत सूचना दिल्या. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत अंतर्गत सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोलीस दलाकडून निर्भया पथकाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे आश्वासनही श्री. दोशी यांनी दिले.
बैठकीमध्ये मुख्यत: उद्योजकांनी औद्योगिक परिसरामध्ये पोलीस गस्त नेमणे, पोलीस चौक्या स्थापन करण्यासह इतर अडचणी सोडविणसाठी पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांना विनंती केली होती.
पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस सातारा शहर, सातारा तालुका, बोरगाव, खंडाळा, शिरवळ, वाई, लोणंद, फलटण ग्रामीण, कोरेगाव, पाटण, उब्रंज, तळबीड यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार व जिल्हा विशेष शाखेतील अंमलदार यांच्यासह पार्ले, कमिन्स, यशराज इथेनॉल, गरवारे, बोकालाईट फुड, पारखीप्लास्ट, क्युबील्ट यांच्यासह 90 पेक्षा जास्त उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.