सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सुरस कथा अध्याय.....
दारु पिणारे, गांजाची नशा करणारे, अफू चरस, ब्राऊन शुगर, व असंख्य नाना तरा करून व्यसन करणारे नशेच्या धुंदीत त चुकीचे प्रकार करत असतात ..
मात्र सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी कर्मचारी दिवसाढवळ्या सुद्धीत राहून मनपाच्या तिजोरीवर दरोडा टाकत असतात त्याला आता काय नाव द्यावे आता तुम्हीच सुचवा.
महानगरपालिका एजे ऑडिटमध्ये कोट्यावधी रुपयाचे बहार अधिकार एससीएल योजना असेल विज बिल घोटाळा असेल भूखंडांचा बाजार असेल नगरचना विभागातील बाजार असेल नुकसान भरपाई चे विषय असतील नुकताच उपायुक्तांचा लाचेचा विषय असेल आणि आत्ता एकाच कामाचे दोन्ही हेड खाली बिले घेतलेला प्रकार असेल अथवा मंजूर हेड सोडून दुसऱ्या हेड मधून बिले काढण्याचा प्रकार असेल किती पद्धतीने मनपा दोषी असणारे अधिकारी वागत आहेत याचा लोकप्रतिनिधी असतील वरिष्ठ अधिकारी असतील किंवा नुकत्याच हाणामाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले आपले विधान भवन असेल याबाबतीत कोण तर सिरीयस होऊन काम करणार आहेत का नाही हा खरा प्रश्न आहे
अधिकारी कर्मचारी यांची किती मुजोरी वाढली आहे याची चौकशी खास एसआयटी नेमून करणे आवश्यक आहे.
याबाबत तक्रारदार संजय कांबळे यांचे अभिनंदन कारण त्यांनी सदर प्रकरण लावून धरून इथे पर्यंत आणले आहे आता ह्या पुढची कार्यवाही मा.आयुक्त सत्यम गांधी यांना विनंती आहे यातील दोषींच्यावर बडतर्फी अथवा निलंबन तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई तात्काळ करावी जेणेकरून येथून पुढे असे प्रकार करताना त्यांचे हात धजावणार नाहीत.
आम्ही याबाबत संजय कांबळे यांच्याकडून कागदपत्रे घेऊन मा मुख्यमंत्री महोदय, नगर विकास सचिव, लोकायुक्त व गरज पडल्यास न्यायालया त यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी दाद मागणार आहोत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली.